Tue, Mar 26, 2019 20:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुर्ल्यात दोन लहान मुलांवर लैंगिक अत्याचार

कुर्ल्यात दोन लहान मुलांवर लैंगिक अत्याचार

Published On: Dec 12 2017 2:07AM | Last Updated: Dec 12 2017 1:09AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार कमी होताना दिसत नसून, कुर्ल्यात राहात असलेल्या दोन नातेवाईक मुलांना एका बंद खोलीत नेत 27 वर्षीय नराधमाने त्यांच्यावर तब्बल सात दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिबू इब्राहीम खान असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

कुर्ला पश्‍चिम परिसरात 11 आणि 12 वर्षाची दोन मुले कुटुंंबासोबत राहतात. याच परिसरात राहत असलेल्या खान याची या मुलांवर वाईट नजर होती. 2 डिसेंबरच्या दुपारी दोन वाजता घराबाहेर खेळत असलेल्या या दोन्ही मुलांना खान याने गाठले. खाऊचे आमिष दाखवत नराधमाने त्यांंना ब्राम्हण वाडी रोडवरील एका बंद फ्लॅटमध्ये नेले. तेथे या मुलांना धमकावून खान याने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पुढील सहा दिवस हा नराधम या मुलांवर लैंगिक अत्याचार करत होता. अत्याचाराला कंटाळलेल्या एका मुलाने घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला.

मुलगा आणि पुतण्यावर लैैंगिक अत्याचार झाल्याचे समजताच वडिलांनी दोघांनाही सोबत घेऊन कुर्ला पोलीस ठाणे गाठले. याबाबत फिर्याद दाखल करुन घेत, मुलांचे अपहरण करुन त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 363, 367, 377 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 6 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीला याच परिसरातून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.