Wed, Nov 21, 2018 13:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मित्रावर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मित्रावर लैंगिक अत्याचार

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 26 2018 1:06AMअंबरनाथ : प्रतिनिधी

वर्गातील एका मित्रावर दोघा अल्पवयीन मित्रांनी लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अत्याचार करणार्‍या अल्पवयीन विद्यार्थ्यांची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकाराने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अंबरनाथ पूर्व भागातील एका खासगी शाळेत नववीत शिकणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी वर्गातीलच एका मित्राला पालिकेच्या स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचार करतानाचा व्हिडीओही काढण्यात येऊन तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यासाठी या दोघांकडून पीडित विद्यार्थ्याकडे  पैशांची मागणीही करण्यात येत होती. यासाठी पीडित विद्यार्थ्याने अत्याचार करणार्‍या मित्रांना पैसेही दिले. मात्र त्यांचा तगादा सुरूच राहिल्याने या पीडित विद्यार्थ्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.