होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 12:25AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात राहणार्‍या एका पाच वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. जनार्दन कापसे असे आरोपीचे नाव असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. 

घोडबंदर रोड परिसरात राहणारी 5 वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत असतांना जनार्दन कापसे या नराधमाने चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या कडेवर बसवून घरात नेले. यावेळी या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित चिमुकलीस गंभीर इजा झाल्या असून तिला उपचार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 डिसेंबर रोजी घटना घडली असून या मुलीने होणारा त्रास आईला सांगितल्यानंतर या प्रकरणी आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार केली.