Sun, Nov 18, 2018 07:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:13AMठाणे : प्रतिनिधी

ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात राहणार्‍या आठ वर्षीय चिमुरडीवर एका 45 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतप्त प्रकार समोर आला आहे. रमेश विजयबहाद्दूर सिंग (45 राहणार - कोलशेत, ठाणे ) असे आरोपीचे नाव असून या नराधमास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मनोरमा नगर परिसरात राहणार्‍या 8 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांचे याच भागात एक दुकान असून 29 एप्रिल 2018 रोजी चिमुरडी आपल्या वडिलांच्या दुकानात खेळत असतांना ती दुकाना मागील शौचालयात गेली होती. यावेळी आरोपी रमेश याने शौचालयात घुसून चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 6 मे 2018 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास या नाराधमाने पुन्हा चिमुकलीवर पाळत ठेवली.    दरम्यान पीडित मुलगी शौचालयात गेली असता तो जबरदस्तीने शौचालयात घुसला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिमुरडीने हा किळसवाणा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्या नंतर त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.