Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शालेय विद्यार्थ्याचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

शालेय विद्यार्थ्याचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:30AMमुंबई : अवधूत खराडे

कफ परेड परिसरातील शाळेत शिकणार्‍या अवघ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याला चाकूचा धाक दाखवत रुमाल तोंडामध्ये कोंबून खुर्चीला बांधत त्याच्यावर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमाने एकाच प्रकारे तीन दिवस मुलावर लैंगिक अत्याचार केले असून यामुळे प्रचंड दहशतीखाली असलेल्या मुलाने शाळेमध्ये जाणे सोडाच, पण घराबाहेर पडणेही बंद केले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन कफपरेड पोलीस तपास करत आहेत.    

मरीन ड्राईव्ह परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये कुटूंबासोबत राहत असलेला 13 वर्षीय मुलगा येथील कफ परेड परिसातील शाळेमध्ये शिकतो. मुलगा शाळेमध्ये, तसेच योगा शिकवणीला एकटाच जात असल्याचे एका नराधामाने हेरुन त्याला 11 जानेवारीच्या सकाळी अकरा वाजता शाळेच्या तीसर्‍या मजल्यावरील जिन्यामध्ये गाठले. मुलाच्या तोंडामध्ये रुमाल कोंबून चाकूचा धाक दाखवत त्याला एका खोलीमध्ये नेत खुर्चीला बांधून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणालाही वाच्यता केल्यास तुझ्यासह कुटूंबाला ठार मारून टाकीन, अशी धमकी या नराधमाने त्याला दिली.

घडल्या प्रकारामुळे मुलगा प्रचंड घाबरला. तरीसुद्धा तो दुसर्‍या दिवशी शाळेत गेला. दुपारी दिडच्या सुमारास या नराधमाने पुन्हा या मुलाला गाठून अशाप्रकारेच त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. शनिवारी बरं वाटत नसल्याचे कारण सांगून आणि रविवारी असलेल्या सुट्टीमुळे मुलगा घराबाहेर पडलाच नाही. सोमवारी सकाळी तो शाळेत गेला असता सकाळी अकरा पुन्हा या नराधमाने 

त्याला गाठून तब्बल अर्धातास त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. नराधमाच्या अत्याचारामुळे दहशतीखाली आलेल्या मुलाने घराबाहेर पडणेच बंद केले. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्याच्या आईने जबाबात सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, आरोपी अद्यापही पोलिसाना मिळू शकला नाही.