होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाड्यात 6 वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार

वाड्यात 6 वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार

Published On: Aug 06 2018 1:41AM | Last Updated: Aug 06 2018 12:53AMकुडूस : प्रतिनिधी

वाडा तालुक्यातील बिलघर गावातील एका सहावर्षीय चिमुकलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात संदेश खरपडे (19, रा. तिळसे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.  

पीडितेला प्राथमिक उपचारांसाठी वाडा ग्रा. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचाराकरीता तिला भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

पीडित चिमुकलीची आई शेतमजुरी करते. ती कामावर गेली असता बहिणीकडे राहण्यास आलेला संदेशने आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर चिमुकली रडत असताना ही बाब गावकर्‍यांना समजल्यावर त्यांनी पोलीस पाटील यांच्या सहकार्याने आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी संदेश विरोधात कलम 376 (2) व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे करीत आहेत.