होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरारमध्ये सेक्स रॅकेट उघड ;३ मुलींची सुटका

विरारमध्ये सेक्स रॅकेट उघड ;३ मुलींची सुटका

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 1:17AM

बुकमार्क करा
विरार : वार्ताहर

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या विरारमधील एक सेक्स रॅकेट पालघर जिल्हा पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या कारवाईत 3 मुलींची सुटका करण्यात आली.तर एका महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

चित्रपटात नायिका, सह नायिका, नृत्यांगना तसेच मोठ्या हॉटेल्समध्ये आणि कॅटरिंग सर्व्हीससाठी मुली हव्या असल्याच्या जाहिराती करून विरार पश्चिमेतील यशवंत नगरात काही मुली बोलावण्यात आल्या. त्यानंतर त्यांना चित्रपटात कामे देण्याऐवजी त्यांच्याकडून बळजबरीने देहव्यापार करण्यास भाग पाडण्यात आले. तसेच कॅटरींग सर्व्हीसच्या नावाखालीही काही मुली या ठिकाणाहून देहव्यापारासाठी पाठवण्यात येत असून हे सेक्स रॅकेट एक महिला चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून त्या महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर सौदा पक्का झाल्याचे सांगून पोलिसांनी या ठिकाणावर धाड टाकली.  सुटका करण्यात आलेल्या मुलींना बोईसर सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.