Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जुहू येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

जुहू येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Jul 15 2018 1:55AM | Last Updated: Jul 15 2018 1:40AMमुंबइ : प्रतिनिधी

जुहू येथील एका सेक्स रॅकेटचा समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी पर्दाफाश केला. या कारवाईत चार दलालांना अटक करण्यात आली तर त्यांच्या तावडीतून आठ महिलांची पोलिसांनी सुटका केली. या आठही महिलांना वैद्यकीय तपासणीनंतर महिला सुधारगृहात पाठविणत आले तर पिटा कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या चारही दलालांना येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नदीम शब्बीर सलमानी, मनिष सुरेश यादव, पिंटू निर्मल यादव, धनश्याम पासवान अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

जुहू परिसरात काही दिवसांपासून एका कुंटनखाना सुरु होता. तिथे काही तरुणीसह महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय प्रवृत्त केले जात आहे अशी माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बोगस गिर्‍हाईकाच्या मदतीने तिथे शहानिशा केली होती. त्यानंतर रात्री उशिरा या पथकाने तिथे छापा टाकून चार तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिसांना एक छुपी खोली असल्याचे दिसून आले. या रुममधून पोलिसांनी सात महिलांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी चार दलालांसह आठ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या सर्वांना नंतर जुहू पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आले होते. या महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले तर चारही दलाल पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.