Sun, Oct 20, 2019 01:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगाव येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

गोरेगाव येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 08 2017 1:11AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गोरेगाव येथे चालणार्‍या एका सेक्स रॅकेटचा बुधवारी बांगुरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. या रॅकेटमधील दोन दलालांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून पाच तरुणींची सुटका करण्यात आली आहे. त्यात चार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या सर्वांना देवनार महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

गोरेगाव परिसरात एक सेक्स रॅकेट कार्यरत असून मागणीनुसार ही टोळी ग्राहकांना मुली पुरवण्याचे काम करते. या मुलींना गोरेगावच्या ग्रीन वेज रेस्टॉरंटमध्ये बोलावले जाते आणि नंतर त्यांना ग्राहकांसोबत विविध लॉज, गेस्ट हाऊस आणि हॉटेलमध्ये पाठवले जात होते. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या पथकातील अधिकार्‍यांनी बुधवारी सायंकाळी ग्रीन वेज रेस्टॉरंटमध्ये साध्या वेशात पाळत ठेवून तिथे आलेल्या दोन्ही दलालांना अटक केली. यावेळी त्यांच्यासोबतच्या पाच तरुणींची पोलिसांनी सुटका केली. त्यात चार मुली अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. मेडीकलनंतर या सर्वांना नंतर देवनार महिला सुधारगृहात पाठवण्यात आले.

दोन्ही आरोपींविरुद्ध भादवि, मानवी तस्करीसह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. अटकेनंतर त्यांना गुरुवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दोन्ही दलालांच्या अटकेनंतर त्यांच्या इतर सहकार्‍यांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.