ठाणे : वार्ताहर
2010 साली पाठलाग करुन एका शाळकरी मुलीला दिलेला फ्लाईंग किस एका तरुणाला चांगलाच भोवला. तिच्या तक्रारीवरुन सुरु असलेला खटला तब्बल 7 वर्षे चालला आणि
न्यायालयाने दयादृष्टी दाखवत संबंधित तरुणाला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
कारावासाची शिक्षा दिल्यास तो गुन्हेगार बनेल, खटल्याचे सात वर्षे वागवलेले ओझे हीच खरी शिक्षा आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले. ठाण्यातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सदर प्रकरण निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. न्याय दंडाधिकारी आर. टी. इंगळे यांनी आरोपीस दोषी ठरवीत 5 हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावून ही रक्कम जिल्हा विधी सहाय्य सेवेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले.
28 जून 2010 रोजी वर्तकनगरच्या शाळेत 9वी इयतेत शिकणार्या शाळकरी मुलीचा पाठलाग करीत तरुणाने फ्लाईंग किस दिले. मुलीने स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपी मंदार अरुण जगताप (21) रा. भीम नगर, वर्तकनगर ठाणे याच्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मंदार विरोधात भादवी 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
तक्रारदार ही अल्पवयीन ती. ती शाळेत शिक्षण घेत होती. आरोपी आणि तक्रारदार यांच्यात कुठलेही वैमनस्य नव्हते किंवा दोन परिवारातही वितुष्ट नव्हते. त्यामुळे तक्रारदाराचे पुरावे ग्राह्य धरीत रोपीला दोषी ठरविण्यात आले. घटना घडली तेव्हा आरोपी 21 वर्षाचा होता. त्याला दोषी ठरवून कारावासातपाठविण्याच्या निर्णयाशी सहमत नाही. त्याला कारागृहात पाठविले असता तो अट्टल गुन्हेगार बनेल. अशा घटना या वयात अनावधानाने घडतात. तब्बल सात वर्ष आरोपीवर खटल्याचे ओझे होते. मानसिक तणाव होता, हीच खरी शिक्षा आहे, असे यालयाने म्हटले.