Mon, Apr 22, 2019 22:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पायी चालणाऱ्या शाळकरी मुलींना म्याजीकची धडक, सात मुली जखमी 

पायी चालणाऱ्या शाळकरी मुलींना म्याजीकची धडक, सात मुली जखमी 

Published On: Sep 12 2018 6:22PM | Last Updated: Sep 12 2018 7:00PMभिंवडी : प्रतिनिधी

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील कन्या शाळेतुन घरी परतणा-या मुलींना मागुन येणा-या टाटा मॅजिक गाडी ने धडक दिल्याने सात शाळकरी मुली जखमी झाल्या आहेत शिवाजी चौक,गणेशपुरी फाटा येथे हा अपघात झाला. या सातही मुली वज्रेश्वरीच्या येथील अंबिकाबाई जाधव कन्या शाळेत शिक्षण घेत आहेत. यापैकी चार मुलींना अंबाडी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर असलेल्या तीन मुलींना भिवंडी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर गणेशपुरी पोलिसांनी म्यजिक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे. 

या अपघातात सुजाता बिपीन जाधव, आकांक्षा पिंटू बसवत, ईशा व अंकिता लक्ष्मण भोईर (रा. घाटघर), परमिट राजरन्दर पाटील (भिनार), नूतन बळीराम कुसल (आंबोडे) व ईश्वरी प्रमोद चव्हाण अशी या जखमी मुलींची नावे आहेत.   

याबाबत अधिक माहिती अशी की, वज्रेश्वरी येथील मुलींची शाळा असलेल्या कन्या छात्रालयातून काल, मंगळवार, (दि. ११ सष्टेंबर) संध्याकाळी ५ च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घाटेघर  येथे आपल्या घरी जाताना बस पकडण्यासाठी गणेशपूरीफाटा येथे नेहमीप्रमाणे पायी चालत येत होत्या. त्या शिवाजी चौक येथे आल्या असताना पाठीमागून आलेल्या भरधाव म्यजिक गाडी (एम एच ०४ इ एक्स ३३४) ने जोरदार धडक दिली होती. या अपघाता नंतर  चालकाने गाडीसह तेथून पळ काढला होता. यावेळी नागरीकांनी चालकास पाठलाग करुन पकडले असता तो दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले असुन नागरीकांनी त्यास गणेशपुरी पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यास भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर च्या अपघातातील जखमी विद्यार्थिनींची प्रकृती  सुधारत असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका महाजन मॅडम यांनी सांगीतले.