Tue, Mar 26, 2019 08:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडी : सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार

भिवंडी : सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:55AMभिवंडी : वार्ताहर 

आई-वडिलांना घराबाहेर काढत जीवे ठार मारण्याची धमकी देवून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तीन नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना भिवंडीतील न्यू आझादनगर येथे गेल्या आठवड्यात घडली होती. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच शहरातील जैतुनपूरा, मंगलबाजार स्लॅब येथील दोन सख्ख्या बहिणींना पैशांचे आमिष दाखवून सात मित्रांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन जणांना पोलीस कोठडीत डांबले असून फरार झालेल्या चार नराधमांचा कसून तपास सुरू केला आहे. अराफत नईम बहाउद्दीन (20 रा. चांद तारा मशीद, दुसरा निजामपूरा), फिरोज मोहम्मद शेख (27 रा. पहिला निजामपूरा) व नुदबीर गुलाम अहमद रईस (34 रा. बर्डी मोहल्ला) अशी अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत. 

या अत्याचारप्रकरणी अटक केलेल्या अराफत, फिरोज, नुदबीर या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय जे. ए. शेख करीत आहे.