Thu, Apr 25, 2019 05:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहा महिन्यांत दररोज सात शेतकर्‍यांच्या आत्महत्या 

सहा महिन्यांत दररोज सात शेतकर्‍यांच्या आत्महत्या 

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 13 2018 12:48AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर करूनही शेतकर्‍यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यातील 1307 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये सरासरी दररोज 7 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

गेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत 1398 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा हा आकडा 91 ने खाली आला आहे. मात्र, विविध भागांचा विचार करता आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. मराठवाड्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये 477 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी याच काळात मराठवाड्यात 454 शेतकर्‍यांनी आयुष्य संपवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम ग्राऊंड’ असलेल्या विदर्भातील परिस्थितीदेखील चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विदर्भात 598 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे.