Fri, May 29, 2020 03:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ६४२ अंशांनी सेन्सेक्सची घसरण

६४२ अंशांनी सेन्सेक्सची घसरण

Published On: Sep 18 2019 2:02AM | Last Updated: Sep 18 2019 2:02AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणार्‍या कच्च्या तेलाच्या किमती व त्याच वेळी घसरणारा रुपया या दोन्हीच्या कात्रीत भारतीय शेअर बाजार सापडलेला असून मंगळवारच्या सत्रात जोरदार घसरण झाली. मुंबई शेअर निर्देशांक (सेन्सेक्स) तब्बल 642 अंशांनी घसरला; तर निफ्टी 186 अंशांनी खाली कोसळले. या सत्रात प्रामुख्याने स्थावर मिळकत, वाहन उद्योग व धातू कंपन्यांच्या शेअर्सची मोठी घसरण झाली.

मुंबई शेअर निर्देशांक सकाळी 37 हजार 169.45 पातळीवर खुला झाला. त्याने दिवसभरात 37 हजार 169.45 अंशांची उच्चांकी व 36 हजार 419.09 अंशांची नीचांकी पातळी नोंदवली. मात्र बाजार बंद होताना कालच्या सत्राच्या तुलनेत त्यात 642.22अंशांची घसरण होऊन तो 36 हजार 481.09 अंश पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारावरील निफ्टी निर्देशांक या सत्रात 185.90 अंशांनी खाली जाऊन 10 हजार 817.60 अंश पातळीवर बंद झाला.

हिंदुस्थान युनिलिव्हर व इन्फोसिस या कंपन्यांमध्ये या सत्रात भाववाढ झाली. तसेच टाटा मोटर्स, पॉवर ग्रीड याकंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली. सर्वाधिक व्यवहार मारुती सुझुकी या कंपनीमध्ये झाले. तिच्या 1 लाख 19 हजार 29  शेअर्समध्ये 74  कोटी 26 लाख रुपयांचे व्यवहार झाले. या सत्रातील तिचा उच्चांकी भाव 6440 रुपये होता तर तिने दिवसभरात 6109.2 रुपयांची नीचांकी पातळी नोंदवली होती. 

या सत्रातील अन्य प्रमुख कंपन्यांचे सरासरी या सत्रातील भाव पुढीलप्रमाणे होते- यस बँक 67.05, 68.85,64.7 व 67.10 रुपये; टाटा मोटर्स 128.75, 130.45, 121.4 व 128.55 रुपये; टाटा स्टील 361.15, 365.95, 342.25 व 361.15 रुपये; एचडीएफसी 2047,2047,1977.5 व 2045.3 रुपये; अ‍ॅक्सिस बँक 670, 670, 638.15 व 671.2 रुपये; स्टेट बँक 285.3, 286.35, 273.10 व 284.55 रुपये; रिलायन्स 1214.8, 1214.8, 1193.7 व 1210.8 रुपये; बजाज फायनान्स 3424.2, 3433, 3354.5 व 3418.5 रुपये; टीसीएस 2154, 2155.85, 2107 व 2149.15 रुपये.