आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला

Last Updated: Apr 01 2020 7:16PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

नवीन आर्थिक वर्षाचा म्हणजे दि. १ एप्रिलचा प्रारंभ भारतीय शेअर बाजारांवर खूपच प्रतिकूल व नकारात्मक वातावरणात झाला. या सत्रात दोन्ही प्रमुख निर्देशांकात मोठी घसरण नोंदवली गेली. जगभरातील आर्थिक मंदी, कोरोना व्हायरसचे थैमान याचा खूप प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर झालेला होता. या सत्रात प्रामुख्याने कोटक महिंद्र बँक व टेक महिंद्र यांच्यात जोरदार घसरण झाली. या सत्रात अनेक बँका व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची भाव पातळी लक्षणीयरीत्या खाली गेलेली होती.

मुंबई शेअर निर्देशांक २९ हजार ५०५.३३ अंश पातळीवर खुला झाला. त्याने २९ हजार ५०५.३३ अंशांची उच्चांकी पातळी व २८ हजार ७३.४३ अंशांची निचांकी पातळीही नोंदवली. मात्र, बाजार बंद होताना कालच्या सत्राच्या तुलनेत त्यात १२०३.१८ अंशांची जोरदार घसरण होऊन तो २८ हजार २६५.३१ अंश पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारावरील निफ्टीमध्ये ३४३.९५  अंशांची घट होऊन तो ८ हजार २५३.८० अंश पातळीवर बंद झाला.

भर कार्यक्रमात कोरोना व्हायरसची तुलना मंत्र्याने थेट बायकोशी केली अन्...!


बाबू भाईचे 'हे' चित्रपट विसरता येणार नाहीत!


औरंगाबाद : 'कोविड सेंटर मुदतीपूर्वीच तयार होणार'


बीड : भाजप आमदाराच्या सासऱ्याचे डॉक्टरांच्या प्रतिनियुक्तीविरुद्ध आंदोलन!


पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून पगार थकल्याने नवले हॉस्पिटलच्या परिचारिकांसह कर्मचारी संपावर


काश्मीर मुद्यावरून गरळ ओकणाऱ्या माजी पंतप्रधानांची मुलांसह त्यांच्याच पक्षातून हकालपट्टी!


सांगली : वारणावतीत गव्यांचा, तर अंबाईवाडीत बिबट्यांचा मुक्तसंचार!


कोल्हापुरात आणखी ३ कोरोनाग्रस्तांची भर 


ओटीटीवर प्रदर्शित होणार पहिला मराठी चित्रपट!


अखेर ठरलं! जयललितांच्या अब्जावधीच्या संपत्तीचे 'हे' असणार वारसदार