Wed, Aug 21, 2019 15:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना बढत्या

मुंबईच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना बढत्या

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असतानाच मुंबई पोलीस दलात बुधवारी बदल्या आणि बढत्या झाल्या. पोलीस आयुक्‍त दत्ता पडसळगीकर यांच्या आदेशाने हे नवनियुक्त्या करण्यात आल्या असून 12 अधिकार्‍यांना मुंबई पोलीस दलातून त्या जागी कार्यमुक्‍त करण्यात आले आहे. 

माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे यांना वरळी पोलीस ठाण्याची, तर सशस्त्र पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र चिखले यांना काळाचौकी पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवली आहे. तर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद नाईक आणि डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग शिंदे यांची मुख्य नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. 

विशेष शाखा 1 मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांना नेहरूनगर पोलीस ठाणे, सुधीर निगुडकर यांना घाटकोपर पोलीस ठाणे, सुरेश पाटील यांना धारावी पोलीस ठाणे आणि श्रीराम कोरेगावकर यांच्या खांद्यावर सांताक्रूझ पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवली आहे. सायन पोलीस ठाण्याच्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड यांची विशेष शाखा 2 येथे नवनियुक्‍ती केली आहे. 

मुंबईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर सहाय्यक पोलीस आयुक्‍तपदी बढती मिळालेल्या 13 अधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. त्यात साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांना डोंगरी विभागाचे सहाय्यक आयुक्‍त, घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांना वाहतूक शाखेत, तर गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नेताजी भोपळे आणि वाहतूक शाखेतील वरिष्ठ  पोलीस निरीक्षक सूर्यकांत तरडे यांची गुन्हे शाखेत, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब काकड आणि वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण काळे यांची आर्थिक गुन्हे शाखेत सहायक आयुक्‍त म्हणून वर्णी लागली आहे.

शहर पोलीस दलातील विविध विभागांत कार्यरत 21 सहाय्यक पोलीस आयुक्‍तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात मंत्रालय सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस आयुक्‍त शंकरसिंग रजपूत यांची मुख्यालय 3, गिरगाव विभागाचे सहायक पोलीस आयक्‍त राजेंद्र चव्हाण यांची संरक्षण आणि सुरक्षा विभागात, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त अभय शास्त्री यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त प्रभाकर लोके, सुनील भोईटे आणि विनोद शिंदे यांना त्याच ठिकाणी नियक्‍ती देण्यात आली आहे. 

मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्‍त म्हणून नियुक्‍त केलेल्या सुनील कुलकर्णी यांना वाहतूक शाखेत, बजरंग बनसोडे यांना ट्रॉम्बे विभाग आणि धुळा टेळे यांना मंत्रालय सुरक्षा विभागात नियुक्‍ती दिली आहे. तर नवी मुंबईतून बदली झालेल्या दिलीप काळे यांना वांद्रे विभाग आणि जर्नादन थोरात यांना गुन्हे शाखेत, तसेच संभाजी निकम यांना पश्‍चिम नियंत्रण कक्ष व संजय शिंदे यांना विशेष शाखा 2 येथे नेमणूक करण्यात आली आहे.

पालघरमधून बदली केलेल्या पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांना वर्सोवा पोलीस ठाण्यात, लोहमार्ग मुंबई येथून बदली झालेल्या नितीन बोबडे यांना मानखुर्द पोलीस ठाण्यात, तर ठाणे शहरमधून बदली होऊन आलेल्या दिलीपकुमार राजभोज यांना विशेष शाखा 1 येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.