Fri, May 29, 2020 03:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'आदित्य ठाकरे म्हणजे दुसरे राहुल गांधी होतील, हवं तर लिहून घ्या'

'आदित्य ठाकरे म्हणजे दुसरे राहुल गांधी होतील, हवं तर लिहून घ्या'

Published On: Sep 22 2019 2:57PM | Last Updated: Sep 22 2019 4:35PM

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेमुंबई : पुढारी ऑनलाईन 

हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका अंजना ओम कश्यप एका वाचाळ वक्तव्याने चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरून थेट विधान सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण देण्याची पाळी आली आहे. 

आदित्य ठाकरे म्हणजे दुसरे राहुल गांधी होतील हवं तर लिहून घ्या, असे वक्तव्य अंजना ओम कश्यप यांनी केले. त्याचे हे विधान चांगलेच व्हायरल झाले. या विधानाचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. 'ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा, लिखकर रख लीजिए' अशा प्रकारे काँग्रेसे नेते राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तुलना केल्याने अंजना ओम कश्यप यांच्यावर सडकून टीका होत आहे. प्रकरणाने गंभीर वळण घेतल्याने माझ्या वक्तव्याचा संस्थेथी त्याचा काही संबंध नाही, मला त्या वक्तव्याचा खेद आहे असे स्पष्टीकरण अंजना ओम कश्यप यांनी दिले. 

यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी कश्यप यांचे नाव न घेता निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करत, ‘कोण काय सिद्ध होईल हे येणारा काळ ठरवेल. पण काही लोकांनी तर भाड्याने पत्रकारिता करायला सुरूवात केली आहे. रस्त्यावरील पोपट देखील पैसे घेऊन भविष्यवाणी करतो, अशा परखड शब्दांमध्ये कश्यप यांना सुनावले.

या व्हिडिओमुळे वृत्तनिवेदक अंजना ओम कश्यप सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातील माझे वक्तव्य मला परिस्थितीचं नीट आकलन न झाल्यामुळे घडलेली चूक होती. परंतु त्यावर द्वेषपूर्ण प्रतिक्रिया उमटल्या. कुठल्याही अंगाने माझ्याकडून व्यक्त झालेले मत चॅनेल अथवा नेटवर्कचे नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात पोहोचले होते. तेव्हा त्यांच्या आगमणाचे प्रसंग या वृत्तवाहिनी प्रसारित होत होते. त्याच वेळी चॅनलमधील ‘पीसीआर’ टीमकडून निवेदक कश्यप यांना देण्यात आलेला माइक सुरूच होता. याची कोणतीच कल्पना कश्यप यांना नव्हती. त्यावेळी चॅनलवर एकीकडे आदित्य ठाकरेंची दृष्य प्रसारीत होत होती.