Mon, Jun 24, 2019 21:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘महाराजां’साठी सेना-भाजपात चढाओढ

‘महाराजां’साठी सेना-भाजपात चढाओढ

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:53AMमुंबई : प्रकाश साबळे 

अंधेरीतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द जोडण्यासाठी शिवसैनिकांनी विमानतळावर बुधवारी आंदोलन केले. तर रविवारीच भाजपाने विमानतळाला महाराज नावाची उपाधी मिळणार असल्याचे पोस्टर लावले होते. शिवसेनेने जीव्हीके प्रशासनाला धारेवर धरून 24 तासांत ‘महाराज’ उल्लेख न केल्यास विमानतळ बंद पाडण्याचा इशाराच आमदार अनिल परब यांनी दै.पुढारीशी बोलताना दिला. 

जीव्हीके कंपनीविरोधात वॉचडॉग फाऊंडेशनचे अध्यक्ष निकलोस अल्मेडा आणि अ‍ॅड.गॉडफे पिमेंटा यांनी खा.गोपाळ शेट्टी यांना पत्र लिहून संबंधित विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती.  खा.शेट्टी यांनी  हा  विषय पावसाळी अधिवेशनात लोकसभेत मांडला होतो. यानंतर हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू, नगर विमान मंत्री अशोक गजपती यांनाही निवेदन दिले होते. 15 दिवसांत ही मागणी पूर्ण केली जाईल, असे उत्तर खा.शेट्टी यांच्या प्रश्‍नाला मंत्र्यांनी दिले होते.  या याविषयाचे श्रेय शिवसेनेने घेवू नये, म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी  विमानतळ परिसरात बॅनर लावले होते.  आपल्या हातून हा विषय जावू नये म्हणून शिवसेनेनेही  ठिय्या आंदोलन केले.

1990 साली शिवसेना व भाजपाच्या आमदार, लोकप्रतिनिधी आम्ही सहार गावकर्‍यांनी आंदोलन केले होते. याआधीही अंधेरी पूर्व मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उचलला होता.