Sun, Nov 18, 2018 19:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोलने कंबरडे मोडले; गाडी विकून घोड्यावरून दूधविक्री!

पेट्रोलने कंबरडे मोडले; गाडी विकून घोड्यावरून दूधविक्री!

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 1:33AMमुरबाड : बाळासाहेब भालेराव

सध्या दररोज होणार्‍या पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. आर्थिक गणित विस्कटल्याने केंद्र सरकारवर सर्वच जण आसूड ओढत आहेत. याच दरवाढीला कंटाळून कॅशलेसफेम धसईचे शेतकरी पांडुरंग विशे यांनी दुधविक्रीसाठी कालपर्यंत वापरलेली  गाडी विकून चक्‍क घोडा खरेदी केला.

सर्वांनीच आता गाड्या विकून घोडे घ्या, असा सल्‍ला त्यांनी दिला आहे. पांडुरंग विशे हे मोटरसायकलवरून दुध विक्री करायचे. परंतु नफ्यापेक्षा पेट्रोलवर जास्त खर्च होऊ लागले. आणि ते गाडीवरून घोड्यावर आले. दूध विक्रीबरोबरच तालुक्याला, लग्नाला, शेतावर जाण्यासाठीही ते आता घोड्यावरच जातात.

Image may contain: 1 person, horse and outdoor