Mon, Apr 22, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलीला आंघोळ करताना पाहणारा बाप अटकेत

मुलीला आंघोळ करताना पाहणारा बाप अटकेत

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 1:57AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

घरी कोणीही नसताना सतरा वर्षांच्या मुलीला आंघोळ करताना पाहणार्‍या 39 वर्षीय पित्याला बुधवारी साकिनाका पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिंडोशी सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सतरा वर्षांची ही मुलगी तिचे आई-वडिल आणि लहान भावासोबत साकिनाका परिसरात राहते. 29 नोव्हेंबरला तिची आई आणि भाऊ कामासाठी बाहेर गेले होते. यावेळी घरात तिच्यासह तिचे वडील होते. सकाळी साडेदहा वाजता ती आंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेली होती. यावेळी तिला बाथरुमच्या लाकडी दरवाज्याच्या होलमधून कोणीतरी पाहत असल्याचा भास झाला होता. तिने दरवाजा उघडून बाहेर पाहिले असता तिथे तिचे वडील उभे होते. आंघोळीनंतर ती काहीही न बोलता तिच्या आजीकडे निघून गेली. 

काही वेळानंतर तिची आई तिथे आली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आजीसह आईला सांगितला. या प्रकारानंतर दुसर्‍या दिवशी त्या दोघीही तिला साकिनाका पोलीस ठाण्यात घेऊन आल्या. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या मुलीने तिच्या पित्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली हेाती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पित्याविरोधात विनयभंग आणि पोस्कोच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत बुधवारी त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.