Sun, Apr 21, 2019 01:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्य्रात राष्ट्रवादीचे बस स्टॉप शोध अभियान

मुंब्य्रात राष्ट्रवादीचे बस स्टॉप शोध अभियान

Published On: Dec 01 2017 4:51PM | Last Updated: Dec 01 2017 4:51PM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

मुंब्रा भागात टीएमटीची बससेवा सुरु करण्यात आली आहे.  मात्र परिसरात बस थांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भात अनेकदा विषय काढूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ  आंदोलन करण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्र्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले.

मुंब्रा, कौसा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यानंतर नियमितपणे टीएमटीची बससेवा सुरु करण्यात आली. ही बससेवा सुरु झाल्या नंतरही येथील बस थांबे गायब झालेले आहेत. जे बस थांबे होते ते ही आता दिसेनासे झालेत. हातामध्ये दुर्बीण घेऊन बसस्टॉप शोधण्याचा प्रयत्न केला. कौसा पोलीस चौकीपासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 

मुंब्रा परिसरातील सुमारे साडे आठ हजार लोक दररोज टीएमटीने प्रवास करीत आहेत. या आधी कौसा ते रेतीबंदर दरम्यान 30 थांबे होते. आता बस थांबाच दिसत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.  त्यामुळे मुंब्रा परिसरात बस थांबे लवकरात लवकर उभा करा असे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.