Thu, Aug 22, 2019 08:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका

समुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका

Published On: Aug 22 2018 1:37AM | Last Updated: Aug 22 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी 

समुद्र किनार्‍यावर येणार्‍या पर्यटकांना सुरक्षा पुरविण्याचा दावा करणार्‍या राज्य सरकारचे उच्च न्यायालयाने मंगळवारी चांगलेच कान टोचले.  सुरक्षा व्यवस्था असताना जूनपर्यंत 49 जणांचा बुडून मृत्यू झाल्याने न्यायमूर्ती  शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली. आगामी गणेश विसर्जनासाठी मुंबईसह राज्यभरातील समुद्र किनार्‍यांवर  सुरक्षा कशी करतात ते  ‘बे वॉच’ मधून शिका असा टोलाही लगावला.

मुंबईसह राज्याला 700 किमी पेक्षी अधिक किनारपट्टी लाभलेली असतानाही त्याच्या सुरक्षेकडे प्रशासन दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून जनहित मंच या सामाजीक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. शंतनू केमकर आणि न्या.सारंग कोतवाल  यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विसर्जनाच्यानिमित्ताने मुंबईसह राज्यभरातील सर्व समुद्र किना-यांवर लाखो लोक जमा होतील. तेव्हा सुरक्षेच्यादृष्टिने चोख बंदोबस्त करा, असे निर्देशही हायकोर्टाने पालिकेसह राज्य सरकारला दिले.