Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘भंगार’वादातून व्यापार्‍यावर  गोळीबार

‘भंगार’वादातून व्यापार्‍यावर  गोळीबार

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात अंधेरीतील व्यापारी अस्लम वली खान (58) यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा पर्दाफाश करण्यात अखेर एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या गोळीबाराची सुपारी देणारा व्यापारी आणि मुख्य आरोपी सिंकद रजान सय्यद सिकंदर बिपल्ला साहा याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून आर्थिक वादातून सुपारी देऊन हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे. 

अस्लम खान यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरी येथील मरोळ चर्चजवळील जार्ज सेंटर अपार्टमेंटच्या एक विंगमधील रुम क्रमांक 401 मध्ये राहतात. शनिवारी 3 ऑगस्टला ते कामावरुन रात्री सव्वाबारा वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानी आले होते. कार पार्क केल्यानंतर ते घराच्या दिशेने जात होते. यावेळी तिथे बाईकवरुन दोन तरुण आले, या दोघांनी त्यांच्या तोंडावर रुमाल बांधले होते, काही कळण्यापूर्वीच त्यापैकी एका तरुणाने त्यांच्यावर गोळीबार केला होता. ही गोळी पोटात घुसल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अलीकडेच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. 

यासंदर्भात अस्लम खान यांच्या जबानीनंतर हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाल्याचे उघडकीस आले. आग्रीपाडा परिसरात राहणार्‍या सिंकद साहा या व्यापार्‍याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने अस्लम खान यांच्यावर गोळीबार करण्यासाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिल्याचे सांगितले.