Thu, Feb 21, 2019 11:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : शीळफाटा येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग(व्हिडिओ)

ठाणे : शीळफाटा येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग(व्हिडिओ)

Published On: Feb 13 2018 1:24AM | Last Updated: Feb 13 2018 1:24AMमुंब्रा : खलील गिरकर 

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा परिसराजवळ असलेल्या शीळफाटा येथील भंगाराच्या गोदामाला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत आठ पेक्षा जास्त गोदामे जळून राख झाल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. 

ठाणे महापालिकेच्या मुंब्रा योथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, रुग्णवाहिका व तत्काळ मदत टीम घटनास्थळी हजर राहून मदतकार्य व आग विझवण्याचे काम करत आहे. 
सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचा दावा काही प्रत्यक्ष दर्शींनी केला आहे मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. 

मध्यरात्री सव्वा बारा  वाजण्याच्या सुमारास लागलेली आग अद्याप विझलेली नसल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. या गोदामांजवळ वास्तव्य असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.