Sun, Jul 21, 2019 08:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अलिबाग सेक्स रॅकेटची व्याप्ती भारतभर 

अलिबाग सेक्स रॅकेटची व्याप्ती भारतभर 

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 1:22AMअलिबाग : निखिल म्हात्रे

अलिबाग सारख्या पर्यटन स्थळावर सोशल मीडियावर जाहीरात करुन भारतीय आणि परदेशी कॉलगर्ल हॉटेलमध्ये पुरविणार्‍या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करत उच्चभ्रु काळ्या पैसेवाल्यांचे काळे धंदे उघड केल्याने एका नव्या गुन्हेगारीची रायगडकरांना नव्याने ओळख झाली आहे. 

जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्या खंबीर भूमिकेमळे या रॅकेटचा शोध लागला असून मुंबई ते अलिबाग असा सुरु असलेला कॉलगर्लचा प्रवास उघड झाला आहे. देशातील आणि परदेशातील कॉलगर्ल आणून गुगल साईटद्वारे व्यापार करणार्‍या 9 जणांना रायगड पोलिसांनी अटक करुन तपास सुरु केला आहे. या सर्वांना 8 दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे. हे रॅकेट केवळ अलिबाग पुरते मर्यादित नसून मुंबई पर्यंत या प्रकरणाची पाळेमुळे आहेत. 

जवळ जवळ पाच ते दहा पंचतारांकीत हॉटेलमध्ये हे प्रकार सुरु असल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याचे समजते. या प्रकरणात आणखी दोन कॉलगर्ल पोलिसांच्या रडारवर असून अलिबागमधील ज्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा देह विक्रीचा काळाबाजार सुरु होता. ते सुध्दा चौकशीच्या रडारवर असल्याचे समजते. या प्रकरणामध्ये अलिबाग तसेच रायगड जिल्ह्यात इंटरनेटद्वारे सेक्स रॅकेट चालवित श्रीमंतांचे चोचले पुरविले जात होते.  या  इंटरनॅशनल रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखने पर्दाफाश करत अलिबाग मधील या कु कृत्याला पायबंद घातला आहे.

अलिबाग शहर व रायगड जिल्ह्यात भारतीय तसेच परदेशी कॉलगर्ल आणून 24 तासासाठी त्या पुरविल्या जात होत्या. एकूण सात कॉलगर्ल अलिबाग येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये येत होत्या. पोलिसांनी स्वत: गिर्‍हाईक म्हणून जाऊन या कॉलगर्लना आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. अलिबागमध्ये अटक झालेल्या कॉलगर्ल पैकी एक कॉलगर्ल ही अल्पवयीन असल्याने तिला कर्जत येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर अन्य कॉलगर्ल आणि साथीदार पोलीस कस्टडीची हवा खात आहेत. 

अलिबाग आणि अन्य काही ठिकाणी कॉलगर्ल पुरविल्या जाण्यचा हा खळबळ जनक प्रकार प्रथमच उघडकीस आला आहे. कॉलगर्ल पुरविण्याचे सेक्स रॅकेटमध्ये विविध जाहिराती सोशल मिडीया व इंटरनेटद्वारे प्रसारित केल्या जात असल्याने संबंधितान विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर हे रॅकेट उघड झाले.