Sun, Nov 18, 2018 03:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळांकडूनच कॉपी पुरविण्यासाठी धडपड

शाळांकडूनच कॉपी पुरविण्यासाठी धडपड

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 1:12AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील

बारावी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच मराठी भाषा विषयाच्या परीक्षेत कॉपी करताना पहिल्याच दिवशी 43 विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. नाशिक विभागात सर्वाधिक 20 तर औरंगाबाद विभागात 11 विद्यार्थी भरारी पथकाच्या हाती लागले. केवळ परीक्षा केंद्र टिकविण्यासाठी केंद्र असलेल्या शाळा व्यवस्थापनाकडूनच यासाठी मदत केली जात असल्याचे यावेळी उघड झाले. 

नाशिक विभागातील धुळे, जळगाव मधील जामनेर, पहूर, शेदुर्णी तर तर औरंगाबाद मध्ये सोयगाव केंद्रावर केंद्राच्या  100 मीटर परिसरात कॉपी बहादरांची जत्रा भरलेली असते. अनेकवेळा बंदोबस्तासाठी नियुक्त केलेले होमगार्ड स्वत: वर्गात जाऊन कॉपी पुरवतात. मुलांची टोळकी शाळेच्या कंपाऊंड वॉलवर चढून वर्गातल्या विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या पुरवत आहेत. कॉपी मुक्तीसाठी सरकारने कितीही तयारी केलेली असली तरी कॉपी बहाद्दरांपुढे सगळेच मातीमोल ठरत आहे. 

राज्यात संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 4 हजार 657 परीक्षा केंद्र आहेत. परीक्षेसाठी राज्यभरात 252 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी बसले आहेत. 9 लाख 73 हजार 134 विद्यार्थी, तर 7 लाख 78 हजार 219 विद्यार्थिनींचा समावेश आहे.16 लाख 37 हजार 783 नियमित विद्यार्थी, 67 हजार 563 पुनर्परीक्षार्थी आणि 46 हजार 7 इतर (खाजगी श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषयासह प्रविष्ठ)आहेत.