Thu, Sep 20, 2018 10:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्कूल बस महागणार

स्कूल बस महागणार

Published On: Sep 06 2018 1:55AM | Last Updated: Sep 06 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी

गेले दहा दिवस सात्यत्याने होणार्‍या इंधनवाढीचा फटका शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. स्कूल बस मालकांनी प्रतिविद्यार्थी प्रतिमहा 75 ते 100 रुपये वाढविण्याचा प्रस्ताव शाळंकडे सादर केला आहे.

मुंबईत पेट्रोल-डिझेलने विक्रमी 86.72 रुपये प्रति लिटर दर गाठल्याने  पुढील महिन्यापासून स्कूल बस फी वाढवण्याचे स्पष्ट संकेत स्कूल बस चालक-मालक असोसिएशनने दिले आहेत. सध्या रस्त्यांवर असलेले खड्डे, वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढला असल्याने स्कूलबस मालकांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळेच दरमहा प्रतिविद्यार्थी 75 रुपयांनी वाढ करावी असा प्रस्ताव शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांकडे सादर केल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.