Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आई रागावल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

आई रागावल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:01AM

बुकमार्क करा

भिवंडी : प्रतिनिधी

आईने घरातील कचरा बाहेर टाकण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून शाळकरी मुलाने भाजी चिरण्याच्या धारदार चाकूने स्वतःलाच भोसकून घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मीठपाडा शेलार येथे शनिवारी घडली. 

ऋतिक ताती (वय 17) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नांव आहे. त्याला त्याची आई गुडीयादेवी हिने घरातील कचरा बाहेर टाकण्यास सांगितले असता त्याने कचरा उचलण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वादविवाद होवून ऋतिक याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील भाजी चिरण्याचा चाकू  घेवून स्वतःच्याच छातीत खुपसला. 

चाकूचा वार फुफ्फुसाला भिडल्याने ऋतिक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.आईने शेजार्‍यांच्या मदतीने त्याला उपचारासाठी तात्काळ स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.