Sat, Jul 20, 2019 08:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूटमध्ये घोटाळा

फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूटमध्ये घोटाळा

Published On: May 16 2018 1:43AM | Last Updated: May 16 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

सांताक्रुझ येथील एका प्रसिद्ध फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी  पोलिसांनी तिथे काम करणार्‍या दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच शाहिता रेहान बाटलीवाला ऊर्फ रिया सिंग या 40 वर्षांच्या महिलेस अटक करण्यात आली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सांताक्रुझ येथे फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूट असून तिथे दोन्ही महिला कामाला होत्या. गेल्या वर्षी दोन विद्यार्थ्यांनी तिथे फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. या दोघांनी सुमारे अडीच लाख रुपये प्रवेशादरम्यान भरले होते, मात्र पैसे भरल्यानंतर त्यांना पावती देण्यात आली नव्हती. हा प्रकार नंतर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाच्या लक्षात येताच त्यांनी त्याची शहानिशा सुरू केली. यावेळी तपासात शाहिता बाटलीवाला हिने दोन्ही विद्यार्थ्यांकडून प्रवेश देताना पैसे घेतले, मात्र त्यांना पावती न देता एका कोर्‍या कागदावर नोंद करून दिले होते. याबाबत तिची चौकशी केल्यानंतर तिने या गुन्ह्यांतील पहिल्या आरोपी महिलेच्या मदतीने हा संपूर्ण घोटाळा केल्याचे उघडकीस आले. 

याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच रिया सिंगला अटक झाली. तिच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.