Thu, Jul 18, 2019 14:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सतीश शेट्टी हत्या प्रकरण; श्वेतपत्रिकेची मागणी

सतीश शेट्टी हत्या प्रकरण; श्वेतपत्रिकेची मागणी

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 12:50AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी खूनाचा तपास संथगतीने सुरु असून या हत्या प्रकरणाची शासनाने श्वेतपत्रिका काढण्यात यावी अशी मागणी  आरटीआय ऍक्टिव्हिस्ट फोरमचे निमंत्रक श्री.अनिल गलगली यांनी केली आहे. 

या मागणीसाठी आझाद मैदानात आरटीआय ऍक्टिव्हिस्ट फोरमतर्फे आयोजित सतीश शेट्टीचे काय झाले? यावर विषयावर  निदर्शने करण्यात आली.  आरटीआय कायदा प्रत्येक सरकार आपआपल्या सोयीने कसा वापरतात याची उदाहरणे दिली.  सतीश शेट्टी हत्या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढली गेली तर सरकार आणि सीबीआयने केलेल्या तपासाची माहिती जनतेसमोर येईल. माहितीचा अधिकार कायदाचे कलम 4 अन्वये देशातील प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने कार्यान्वित केले तर माहिती अधिकार अर्जाची संख्या कमी होऊ शकते आणि सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते पण सरकार आणि बाबू मंडळी जाणूनबुजून त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही गलगली यांनी केला.

तर  फोरमचे अध्यक्ष सुधाकर कश्यप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस 5 मागण्यांचे पत्र पाठवित मुख्य माहिती आयुक्त नेमणे तसेच निवृत्त न्यायाधीसांस प्राधान्य देण्याची मागणी केली.  यावेळी महाराष्ट्रातील पुणे, परभणी, नगर, सांगली या भागातून आरटीआय कार्यकर्ते आले होते. यात स्वाती पाटील, रमेश खानविलकर, शंकर पुजारी, अरुण माने, प्रवीण अरुणकर, क्षीरसागर आदी उपस्थित होते. याप्रसंगी सतीश शेट्टीचे काय झाले, अशा घोषणाही देण्यात आल्या.