Sun, Jul 21, 2019 12:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अतिक्रमणावर कारवाईसाठी साताऱ्याच्या रहिवाशाचे उपोषण

अतिक्रमणावर कारवाईसाठी साताऱ्याच्या रहिवाशाचे उपोषण

Published On: Jan 25 2018 5:31PM | Last Updated: Jan 25 2018 5:31PMमुंबई : प्रतिनिधी

सरकारी जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी या मागणीसाठी सातारा येथील संतोष शिवाजी दबडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आझाद मैदानात त्यांनी उपोषणाला सुरूवात केली असून नगरविकास सचिव श्री. मोघे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केसरकर पेठ सातारा व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी विद्यापीठ व सदर बाजार सातारा या दोन ठिकाणी सरकारी जागेवर अवैध बांधकाम करण्यात आले आहे. त्यावर कारवाई करण्यात जिल्हाधिकारी, सातारा नगरपालिका सीईओ, मुख्याधिकारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी, उपविभागिय अधिकारी, तहसिलदार सातारा यांनी कामचुकारपणा केल्याचा आरोप दबडे यांनी केला आहे.