Sun, Jan 20, 2019 19:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरपंचांचे मानधन वाढविणार 

सरपंचांचे मानधन वाढविणार 

Published On: Dec 08 2017 2:20PM | Last Updated: Dec 08 2017 2:20PM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी  

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचा मान सरकार दरबारी वाढणार आहे. सरपंचांचे मानधन वाढीसाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगतानाच प्रत्येक सरपंचाला ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 

पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पहिलाच सरपंच दरबार घेतला. या दरबाराला सरपंचांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळी मुंडे म्हणाल्या, राज्यातील गावांध्ये पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांबरोबर हिवाळी अधिवेशनादरम्यान बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल.