Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वावर वांगणीचे सरपंच, उपसरपंच दहावी उत्तीर्ण

वावर वांगणीचे सरपंच, उपसरपंच दहावी उत्तीर्ण

Published On: Jun 09 2018 1:57AM | Last Updated: Jun 09 2018 1:39AMजव्हार : वार्ताहर

जव्हार तालुक्यातील आदिवासीबहुल वावर वांगणी ग्रामपंचायत या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच तारा शिंदे (71 टक्के) तर उपसरपंच यशवंत बुधर (61.20 टक्के) हे दोघेही दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. या दोघांचे जेमतेम 8 वी पर्यंत शिक्षण झाले आहे.  पण, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, शिक्षण असेल तरच आपण आपल्या ग्रामपंचायतीचा विकास करू शकतो, या दृष्टिकोनातून यंदा दोघे 17 नंबर फार्म भरून परीक्षेला बसले होते आणि जिद्द, मेहनतीच्या जोरावर दोघांनी घवघवीत यश मिळवले.

आम्हाला आमच्या आदिवासी बांधवांचा विकास करायचा आहे. मात्र, शिक्षणाशिवाय विकासाला गती नाही. याच जिद्दीने आम्ही परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो, अशी प्रतिक्रिया या दोघांनी दिली.