ठाणे : वार्ताहर
पूर्व वैमनस्यातून 22 जुलै, 2014 रोजी ठाण्याच्या वंदना सिनेमा येथील परिसरात झालेल्या संजय रोकडे हत्याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने आरोपी मंगेश देविदास जाधव, मनीष देविदास जाधव, निलेश खंडू कटाते, मनोज जयराम सोनावणे, गणेश नारायण देवाडिगा यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
न्यायालयाने या प्रकरणाचे तपास अधिकारी मच्छिंद्र भिमाजी थोरवे यांच्या तपासकामावर ताशेरे ओढीत, पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मछिंद्र थोरवे यांनी जाणीवपूर्वक आरोपीना फायदा होईल अशी तरतूद केल्याचा ठपका न्यायमूर्ती पी.आर. कदम यांनी निकालात नमूद केला. न्यायालयात विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी कौशल्याने न्यायालयात सरकारची बाजू मांडून तब्बल 20 साक्षीदार तपासले. यात फिर्यादी जखमी जयंत भोईर यांच्यासह तीन वैद्यकीय अधिकारी, पंच यांचा समावेश होता. यन्यायालयाने या पाचही आरोपीना 18 जानेवारी, 2018 रोजी दोषी ठरविले. मंगळवारी शिक्षा ठोठावल्यानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.