Thu, Sep 21, 2017 23:16
30°C
  Breaking News  

होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...म्‍हणून संजय दत्तची सुटका केली : राज्य सरकार

...म्‍हणून संजय दत्तची सुटका केली : राज्य सरकार

Published On: Jul 17 2017 6:09PM | Last Updated: Jul 17 2017 6:06PM

बुकमार्क करा


मुंबई : पुढारी ऑनलाइन वृत्त

मुंबई येथे १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्‍बस्‍फोटातील दोषी अभिनेता संजय दत्तची शिक्षा पूर्ण होण्याआधीच का सुटका करण्यात आली यावर त्‍याची वर्तुणूक चांगली असल्याने शिक्षा कमी केली असल्याचे राज्य सरकारने उच्च न्‍यायालयाला सांगितले. संजय दत्तची शिक्षा पूर्ण होण्याआधीच का सोडण्यात आले असा सवाल उच्च न्यायालयाने केला होता. यावर राज्य सरकारने सोमवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

उच्च न्‍यायालयाकडून दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने 'संजय दत्त बाबतीत कोणत्याही नियमांचं उल्लंघंन झाले नसून, त्याला जेलमध्ये दिलेली कामे त्याने वेळेत पूर्ण केलीत. तसेच त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती' असे स्पष्ट करण्यात आले आहे.