होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासदार संभाजीराजेची किल्ले रायगडाला भेट; विविध कामाची पाहणी 

खासदार संभाजीराजेची किल्ले रायगडाला भेट; विविध कामाची पाहणी 

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 12 2018 8:41PMमहाड : प्रतिनिधी

रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आज गुरूवार (१२ एप्रिल) दुपारी किल्ले रायगडाला भेट दिली. यावेळी गडावर सुरू असलेल्या विविध कामाची त्यांनी पाहणी केली. तर गडावर उपस्थित असलेल्या केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विविध कामांसंदर्भात उपयुक्त सूचना केल्या.

खासदार संभाजीराजे म्हणाले, आधिवेशन काळात किल्ले रायगडला भेट देता आली नसल्याने, आज गुरूवार दिवसभर गडावर चाललेल्या विविध कामांची पाहणी केली. रायगडावर सुरू असलेले उत्खननाचे काम अत्यंत चांगल्या पध्दतीने चालू आहे. शास्त्रोक्त पध्दतीने चाललेल्या या उत्खननात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. यामुळे एका मोठ्या वाड्याचे अवशेष प्रथमच उजेडात आले असल्याचे ते म्हणाले.