Wed, May 22, 2019 10:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात सलून महागले!

ठाण्यात सलून महागले!

Published On: Jan 18 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 1:40AM

बुकमार्क करा
ठाणे/मुंबई : खास प्रतिनिधी 

पेट्रोल-डिझेल, भाजीपाल्यानंतर आता सलूनमध्ये दाढी करणे, मुछ सेटिंग करणे महागलेे आहे. त्यांच्या दरात दहा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या सलुनमध्येही केस कापण्यासाठी 60 रुपये आणि दाढी करण्यासाठी 40 रुपये मोजावे लागत आहेत. केस रंगविण्याचे दर दुप्पट करण्यात आले आहेत.

नाभिक सलून असोसिएशनने दरवाढीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू केली आहे. सलुनमधील 32 प्रकारांच्या सेवेमध्ये दहापासून 50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता केस कापण्यासाठी पन्नास रुपयांऐवजी 60 रुपये मोजावे लागत आहे. साध्या दाढीला 40 रुपये तर स्पेशल शेविंग 50, फोम शेविंग 60, हेअर सेटिंग 40, फ्रेंच शेविंग 50 रुपये, मुछ सेटिंग 10, फेस मसाज साधी 120 रुपये, नेव्ही मसाज 220, केसांना कलर करण्यासाठी 120 रुपये मोजावे लागत आहे. फेशियल 500 रुपये, ब्लीचिंग 250 रुपये, स्टीम 50 रुपये, स्टाईल कटिंगसाठी 70 रुपये घेतले जात आहेत. हे दर दोन वर्षांनी वाढविण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रियाज बावा यांनी दिली.

एकीकडे ठाण्यात सलून दरवाढीचा निर्णय झाला असला तरी मुंबईकरांचि तूर्त या महागाईतून सुटका झालेली आहे. संत नाभिक संघटनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत संघटनेची दरवाढीसंदर्भात कोणतीही बैठक झालेली नाही त्यामुळे सलूनच्या दरामध्येही कुठलाच बदल झालेला नाही.