काळवीट शिकारप्रकरणी सलमानचा आज फैसला

| पुढारी"> 
Thu, Sep 20, 2018 08:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›

काळवीट शिकारप्रकरणी सलमानचा आज फैसला

काळवीट शिकारप्रकरणी सलमानचा आज फैसला

Published On: Apr 05 2018 2:24AM | Last Updated: Apr 05 2018 2:11AMजोधपूर : वृत्तसंस्था  

अभिनेता सलमान खान याच्यासह अन्य पाच कलाकारांवरील काळवीट शिकार प्रकरणातील खटल्याची गुरुवारी जोधपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमान, सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंह यांच्यावर दोन काळविटांची शिकार केल्याचा आरोप आहे. 

1998 साली राजस्थानच्या कानकानीमध्ये या कलाकारांनी काळविटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यावेळी चित्रीकरणासाठी हे कलाकार राजस्थानला गेले होते. मागच्या आठवड्यात जोधपूर ग्रामीण न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली. जवळपास 19 वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू आहे.