Wed, Jul 24, 2019 07:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सलमान खान, शिल्पा शेट्टीवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

सलमान खान, शिल्पा शेट्टीवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 1:27AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

वृत्त वाहिनीवरील मुलाखतीत वाल्मिकी समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य करून अवमान केल्याप्रकरणी सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइंने केली आहे. तशी तक्रार अंधेरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. रिपाइं (ए) रोजगार आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस नवीन लादे यांनी ही तक्रार दिली आहे.  

या तक्रारीला रिपाइंचे उपाध्यक्ष तथा रिपाइं फिल्म अँड टीव्ही युनियनचे अध्यक्ष किशोर मासूम यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात सलमान व शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात एससी/एसटी (पीओए) अमेंडमेंट अ‍ॅक्ट 2015 च्या कलम 3 (1) (आर) (यू) च्या गुन्ह्यासाठी कलम 4 (2) (बी) अन्वये एफआयआरची नोंदणी करावी, तसेच  26/1/2016, 7 (1) (सी) (डी) नागरी हक्क कायदा 1955 चे संरक्षण, अपमान करणे आणि गैरव्यवहार करणे तसेच चुकीची भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहित करणे आणि अवमानकारक शब्द वापरून अपमान करणे आदी गुन्हे नोंदविणे आवश्यक असल्याचे नवीन लादे यांनी म्हटले आहे.