नवी मुंबई : राजेंद्र पाटील
मंत्रालयातील विविध 13 विभागांत अंशकालिक पदावर काम करणार्या 12 हजार 26 कर्मचार्यांना आता राज्य वेतन सुधारणा 2008 च्या शिफारशीनुसार वेतन दिले जाणार आहे. या पदावर काम करणार्या कर्मचार्यांना सध्या दरमहा मिळत असलेले नियत किंवा एकत्रिकृत दिले जाणारे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी जारी केला.
ही वाढीव रक्कम सहाशे रुपये व कमाल बाराशे रुपयांच्या मर्यादेत असेल. 1 सप्टेंबर 2010 पासून पूर्वलक्षीप्रभावाने ती दिली जाणार आहे. तब्बल आठ वर्षानंतर ही फरकाची रक्कम अंशकालिक कर्मचार्यांच्या पदरात पडणार असल्याने गणपतीबाप्पा पावला असेच म्हटले जात आहे. अर्थात बाराशे पेक्षा अधिक नियत व एकत्रिकृत वेतन घेणार्या अंशकालिक कर्मचार्यांच्या वेतनात कोणताही बदल होणार नाही. विविध विभागात कार्यरत असलेल्या विविध पदावरील अंशकालिक कर्मचार्यांना ही खुशखबर दिली. त्या त्या विभागांनी पाठवलेला प्रस्ताव मान्य करत शासनाने सोमवारी तसा निर्णय जारी केला.या निर्णयाचा फायदा सार्वधिक आरोग्य विभागातील 10 हजार 579 अंशकालिक कर्मचार्यांना होणार आहे. विधी व न्याय विभागातील 840 कर्मचारी, ग्रामविकास 387 कर्मचार्यांना त्यामध्ये समावेश आहे.