Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभ्यास तर कराच, पण खेळाही : सचिन तेंडुलकर

अभ्यास तर कराच, पण खेळाही : सचिन तेंडुलकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने मुंबईतील शिवडी येथील एका शाळेला बुधवारी भेट दिली. वर्गांचे बांधकाम व सुधारणा यासाठी सचिनने निधी मंजूर केलेल्या सुरुवातीच्या काही शाळांध्ये गुरू गोविंद सिंग टी स्कूल या शाळेचा समावेश होता. या सुधारणेचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. भरपूर अभ्यास करावा व खेळण्यासाठी वेळ काढावा, असे आवाहन त्याने मुलांना प्रोत्साहिते केले.

सचिन तेंडुलकरने एमपीएलएडीद्वारे शालेय व शैक्षणिक संस्था प्रकल्पांना 7.4 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठीच नाही, तर सार्वजनिक सेवांसाठीही एम पीएलएडी निधीचा वापर करण्यामध्ये सचिन आघाडीवर आहे. अनेक शाळा व शैक्षणिक संस्था यांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याबरोबरच, सचिन पोलीस विभाग असा विविध सार्वजनिक सेवांनाही पाठिंबा देत आहे.
 

Tags : Sachin Tendulkar, School Children, Study, Sewri, Mumbai, Sachin Member of Rajya Sabha


  •