Sun, Aug 25, 2019 19:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सचिन सावंतची गळाभेट घेत छातीत गोळी घालून हत्या

सचिन सावंतची गळाभेट घेत छातीत गोळी घालून हत्या

Published On: Apr 28 2018 2:00AM | Last Updated: Apr 28 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचे पदाधिकारी सचिन सावंत यांची हत्या टिपवरुन झाली असून मारेकर्‍यांनी त्यांची गळाभेट घेऊन अचानकपणे छातीत गोळी झाडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. रविवारी 22 एप्रिलला मालाडच्या साईबाबा मंदिराजवळ सचिन सावंत हे त्यांच्या मित्रांसोबत बाईकवरुन जात होते. त्यापूर्वी त्यांची शिवसेना शाखेत एक बैठक होती. ही बैठक संपताच ते घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी मारेकर्‍यांनी त्यांची बाईक ओव्हरटेक केली. बाईकवरुन एक तरुण खाली उतरला आणि त्याने सचिन सावंत यांची मिठी मारली, काही कळण्यापूर्वीच त्याने त्यांच्या छातीत पिस्तूलने एक गोळी झाडली. त्यात ते जागीच कोसळले.

अचानक गोळीबार करुन मारेकरी पळून गेल्याने त्यांच्या मित्राला सुरुवातीला काहीच कळले नाही, मात्र सचिन सावंत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच त्यांनी पोलिसांना फोन केला. प्राथमिक तपासात मारेकरी त्यांच्या मागावर होते, त्यांना शाखेतील मिटींगची माहिती होती, मिटींग संपल्यानंतर त्यांना एका व्यक्तीने टिप दिली असावी, त्यानंतर मारेकर्‍यांनी त्यांचा पाठलाग करुन अगदी जवळून त्यांच्या छातीत गोळी झाडल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघडकीस आले आहे. 

Tags : Mumbai, mumbai news, Sachin Sawant, murder,