Tue, Apr 23, 2019 21:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटी भाडेवाढीचा ३० टक्क्यांचा प्रस्ताव

एसटी भाडेवाढीचा ३० टक्क्यांचा प्रस्ताव

Published On: Jun 01 2018 1:37AM | Last Updated: Jun 01 2018 1:10AMमुंबई : प्रतिनिधी

इंधनाचे वाढते दर आणि कर्मचार्‍यांच्या वेतन वाढीमुळे एसटी महामंडळावर येणारा आर्थिंक बोजा कमी करण्यासाठी महामंडळाच्यावतीने एसटीच्या भाड्यात तब्बल 30 टक्के वाढीचा प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती, तसेच महामार्गावरील टोलच्या दरात झालेल्या वाढीची तफावत दुर करण्यासाठी हा दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

एस. टी. प्रशासनाने आपोआप भाडेवाढीच्या सुत्रानुसार इंधन दरात झालेली वाढ, भविष्यात कर्मचार्‍यांच्या वेतनकराराच्या अनुषंगाने येणारा आर्थिक बोजा, वाहनांच्या सुट्या भागाचे वाढलेले दर या घटकांचा विचार करुन एसटीचे तिकीटदर 30 टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या अध्यक्षांना सादर केला आहे. डिझेल दरवाढीमुळे सुमारे 470 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम खर्च होणार असून, तेवढीच रक्कम कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसाठी तरतूद करणे अपेक्षित आहे. 

त्याचबरोबर वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती व महामार्गावरील टोल दरात झालेली वाढ यामुळे तब्बल2  हजार 200 कोटी रुपये संचित तोटा सहन करणार्‍या एस. टी. महामंडळाला नाईलाजास्तव 30 टक्के भाडेवाढ करणे गरजेचे आहे. त्यानुसार भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते सादर केला आहे. तेच अंतिम निर्णय  घेतील असे एस.टी. प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.