Tue, Jul 23, 2019 06:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ST Srike Live : संप मागे घेण्याचे संचालकांचे अवाहन; कर्मचारी संपावर ठाम!

ST Srike Live :संप मागे घेण्याचे संचालकांचे अवाहन; कर्मचारी संपावर ठाम!

Published On: Jun 09 2018 12:26PM | Last Updated: Jun 09 2018 4:30PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी अचानक संप पुकारल्याने शुक्रवार (९ जून) सकाळपासून ग्रामीण व लांबपल्ल्यांच्या  एसटी बसेस धावल्या नाहीत. अचानक संप पुकारल्याचा फटका मात्र भाविक व प्रवाशांना बसला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. 

Live Updates

 

मुंबई : एस.टी संप मागे घेण्याचे आवाहन एस.टी चे उपाध्यक्ष आणि  व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी केले मात्र मागण्या मान्य केल्याशिवाय संप मागे घेणार नाही या भूमिकेवर ठाम 

मुंबई : संप मागे घेण्याचे संचालकांचे अवाहन; कर्मचारी संपावर ठाम!

हिंगोली : संप काळात कामाच्या अतिरीक्त भारामुळे एस.टी चालक डि.डि.अवचर यांचा हृदयविकाराने मृत्यू  

सांगली : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद व पुणदी गावाजवळ  आटपाडी एसटी बसवर पुनदी फाटा येथे अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामध्ये बस ड्रायव्हर सुधीर चपाटे यासह एक प्रवासी जखमी 

औरंगाबाद : आज सकाळपासून औरंगाबादमधील मुख्ये बसस्थानक व सिडको बसस्थानकात संपाचा परिणाम; मुखे बसस्थानकातून सकाळी सात ते आठ बसेस विविध मार्गावर धावल्या. पण, आता वाहतूक पूर्णपणे बंद आहे

Image may contain: sky and outdoor

औरंगाबाद : संप काळात प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी खाजगी वाहनांना परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशी खाजगी वाहनाने प्रवास करत आहेत. खाजगी वाहनचालक मनमानी भाडे आकारणी करत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

सोलापूर : राहुरी बस स्थानक बनले क्रिकेट मैदान. बस स्थानकात एकही गाडी नसल्याने प्रवाशांची भिस्त अवैध वाहतुकदारांवर

Image may contain: one or more people and outdoor

सोलापूर : सोलापूर - पंढरपुर वीनावाहक बसचा प्रवास सुरू..काही बसेस रस्त्यावर धावल्या

Image may contain: sky and outdoor

सातारा : कर्मचाऱ्यांची निदर्शने; आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, सरकारचा निषेध असो..संपाला १०० टक्के पाठिंबा 

रायगड (महाड) : बंदच्या दुसर्‍या दिवशी आज महाड एस.टी. आगार पूर्णपणे बंद

कोकण (कुडाळ) : कुडाळ आगाराच्या दोन बसवर आज शनिवारी अज्ञाताकडून दगडफेक

सांगली : एसटी कर्मचारी संपामुळे सांगली बसस्टॅन्डवर शुकशूकाट; खासगी वाहतूकदारांची प्रवाशांवर शिरजोरी

 

गडहिंग्लज :  स्थानकावर दुसर्‍या दिवशी गोंधळ; कोल्हापूरातून आलेल्या एसटीमुळे स्थानिक कर्मचार्‍यांचा संताप