Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणपतीसाठी एसटी महामंडळाची जय्यत तयारी

गणपतीसाठी एसटी महामंडळाची जय्यत तयारी

Published On: Aug 31 2018 2:09AM | Last Updated: Aug 31 2018 1:22AMठाणे : प्रतिनिधी 

अवघ्या 13 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सावासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनी एस.टी.ला यंदा भरभरून प्रतिसाद दिला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधून सुमारे 2,500 हून आधिक बसेस सुटणार आहेत. चाकरमान्यांच्या वाटेत कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. कोकणच्या वाटेवर धावण्यासाठी राज्यातल्या 4 आगारांमधून 1750 बसेस मागविण्यात येणार आहेत.

कोकणात गणेशोत्सवात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी सुरू झालेल्या ग्रुप आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईतून 1200 हून आधिक, ठाणे 920 आणि पालघर मधून 250 बसेस सुटणार आहेत. गणेशोत्सवासाठी 8 सप्टेंबरपासून बसेस सुटणार आहेत. मुंबई, ठाणे व पालघऱ मधून आरक्षणाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेवून महामंडळाने जय्यत तयारी सुरू केली. गणेशोत्सवाच्या काळात होणारी वाहतूक वेळेत व्हावी, खड्ड्यांमुळे प्रवाशांना होणारा विलंब टाळला जावा, यासाठी महामंडळाच्या वतीने वाहतूक विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे. 

गणेशोत्सव काळात होणार्या वाहतूकीसाठी बसेसची कमतरता पडू नये यासाठी महांडळाच्या वतीने ठाणे, मुंबई आणि पालघर येथे  जादा बसची कुमक राज्यातील 4 आगारातून चालक - वाहकांसह मागविली आहे. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे विभागातून प्रत्येकी 450 बसेस गणेशात्सवाच्या वाहतूकीसाठी मागविण्यात आल्या आहेत.  या बसेस वाहक, चालकासह मागवण्यात आल्या आहेत.