Tue, Apr 23, 2019 09:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आषाढी एकादशी दरम्यान संप करू नका

आषाढी एकादशी दरम्यान संप करू नका

Published On: Jul 22 2018 1:24AM | Last Updated: Jul 22 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी

आषाढी एकादशी दरम्यान संप करू नका, असे आदेश देतानाच  पुढील सुनावणीपूर्वी मान्यताप्राप्त संघटनेच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने शुक्रवारी दिले. एसटी कामगार संघटनेच्या वतीने बेकायदेशीर वेतन कपातीस स्थगिती देऊन परिपत्रक रद्द करावे. याकरीता 17 जुलैला दोन वेगवेगळ्या वांद्रे येथील औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर सुनावणी झाली. 

संघटनेच्या वतीने शंकर शेट्टी यांनी कामगारांना संपावर जाण्याची वेळच का येते?, असा सवाल केला. शब्द देऊनही कशा प्रकारे फसवले जाते? 4849 कोटींमध्ये मान्यताप्राप्त संघटनेने 31/3/16 च्या मुळ वेतनात 1190 चा प्रस्ताव दिला असताना त्यावर संबंधितांकडून चर्चा टाळली जात आहे. कामगारांना न्याय लाभापासून वंचीत ठेवले जात आहे. शासनाने मान्य करूनही कामगारांवरच्या कारवाया रद्द केल्या नाहीत. इ. बाबींवर जोरदार आक्षेप शेट्टी यांनी नोंदविला.