Wed, Sep 26, 2018 10:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नळावर डब्बा धुतल्याने एसटीच्या वाहकाला मारहाण

नळावर डब्बा धुतल्याने एसटीच्या वाहकाला मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पनवेल : विक्रम बाबर 

पनवेल येथील साई या गावातील नळावर डब्बा धुतला म्हणून एसटी वाहकाला मारहाण केल्याची घटना काल (शनिवार, ३१ मार्च) रात्री घडली. मारहाणीत एसटी वाहक जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखम झाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल आगारातील एसटी साई गावात मुक्कामासाठी होती. त्या एसटीचे वाहक आर.के गावंड यांनी संध्याकाळी एसटीमध्ये बसून जेवण केले. त्यानंतर जेवणाचा डबा सार्वजनिक नळावर धुवायला गेले. त्या ठिकाणी अज्ञातांनी इथे डबा का धुतलास? असे म्हणत गावंड यांना मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर जखम झाली आहे. या घटनेनंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच एसटीच्या कर्मचारी वर्गातर्फे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.

Tags : ST, Bus, Conductor, Attack, Panvel, Raigad


  •