Tue, Nov 13, 2018 21:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल चाचणी निकाल : 21 टक्के विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्राची ओढ

कल चाचणी निकाल : 21 टक्के विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्राची ओढ

Published On: May 12 2018 4:18PM | Last Updated: May 12 2018 4:18PMमुंबई : प्रतिनिधी

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. दहावीनंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांना त्यांची आवड व क्षमता काय आहे, यावर त्यांना कलचाचणीतून मार्गदर्शन केले जाते.  

यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या 17 लाख 36 हजार विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिली होती. त्यातील 21 टक्के विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रात रुची असल्याचे दिसून आले. ललित कला क्षेत्राकडे 18 टक्के तर युनिफॉर्मड सेवा क्षेत्रात 15 टक्के, कृषी 13 टक्के, कला 11 टक्के, आरोग्य विज्ञान 12 टक्के आणि तांत्रिक क्षेत्राकडे 10 टक्के विद्यार्थ्यांचा कल दिसून आल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.