Mon, Apr 22, 2019 15:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Published On: Mar 01 2018 2:47PM | Last Updated: Mar 01 2018 2:47PMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईच्या प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या ऋतिक घडशीचा गुरुवारी पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ऋतिकचा दहावीचा गुरुवारी पहिला पेपर होता. केईएम रुग्णालयात ऋतिकला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, एवढ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका येणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे.

गुरुवारी दहावीच्या पेपरची तयारी करत असतानाच, मुंबईच्या प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या ऋतिकवर काळाने घाला घातला. गुरूवारी पहाटे अभ्यास करून झोपल्यानंतर ऋतिक उठलाच नाही. त्यानंतर पहाटे दीडच्या सुमारास ऋतिकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ऋतिकला तातडीने मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 “ऋतिकला गुरूवारी पहाटे रुग्णायलात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.”असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अविनाश सुपे यांनी सांगितले.