Wed, Jul 24, 2019 07:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हुश्श पास झालो; ४५ टक्के गुण मिळवलेल्या मुलाची बुलेटवरून मिरवणूक

हुश्श पास झालो; ४५ टक्के गुण मिळवलेल्या मुलाचा ‘जल्लोष’

Published On: Jun 08 2018 5:43PM | Last Updated: Jun 08 2018 5:43PMमहाड: प्रतिनिधी

आज शालांत परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऐंशी नव्वद टक्के गुण मिळवले विद्यार्थ्यां आपल्या यशाचा आनंद  साजरा करीत असतानाच महाडमध्ये कमी गुण मिळवलेल्या एका सामान्य विद्यार्थ्यांने देखील नाउमेद न होता आपल्याला मिळालेल्या या यशाचा आनंद तीतक्याच उत्साहात साजरा केला. ४५ टक्के गुण मिळवलेल्या या विद्यार्थ्यांला आपण दहावी परिक्षेत पास झाल्याचा अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसला. या यशस्वी विद्यार्थ्याची त्याच्या मित्रांनी चक्क मोटारसायकल वरुन मिरवणूक काढून आपल्या मित्रांच्या यशाचा आनंद साजरा केला.

प्रथमेश राजेश डोळस असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो महाडमधील कोएसोच्या वि.ह.परांजपे विद्यालयाचा विद्यार्थी आहे. आपल्याला शालांत परिक्षेत ४५ टक्के गुण मिळाल्याची माहिती त्याला समजताच त्याच्या आनंदाला अक्षरशः पारावर उरला नाही. प्रथमेश पास झाल्याचे माहिती त्याच्या मित्रांना समजताच त्यांनाही अत्यानंद झाल्याचे पहायला मिळाले. त्याच्या मित्रांनी  मोटारसायकलवरुन प्रथमेशची गळ्यात शाल, हार घालून जयघोष चक्क बाजारपठेतून मिरवणूक काढून आपल्या मित्राच्या यशाचा आनंद साजरा केला. प्रथमेश देखील जग जिंकल्याचा आनंद साजरा करीत मिरवणूक नागरीकांना अभिवादन करीत होता. 'जो जीता वोही सिकंदर' असा आनंद प्रथमेश च्या चेहऱ्यावर जाणवत होता.

कोएसोचे संचालक दिलीपशेठ पार्टे यांनी प्रथमेशचे पुष्पहार घालून अभिनंदन करीत त्याच्या यशाला दाद दिली. आज शांलांत परिक्षेत ९५ टक्के वा त्याहून अधिक गुण कोणाला मिळाले त्यापेक्षा ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या प्रथमेशच्या कौतुकाचीच चर्चा महाड शहरात चांगलीच रंगली होती.

नाराज विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा

प्रथमेशप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असतील. अनेक विद्यार्थी नाउमेद होऊन खचून जातात. प्रसंगी आत्महत्येचा विचार करतात. कमी गुण मिळणे ही शिक्षा समजून इच्छा असलेल्या क्षेत्रात प्रवेश घेत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी प्रथमेश हा एक नवी उमेद आणि प्रेरणाच बणून आला आहे. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रथमेश प्रमाणेच हसत-हसत त्या गुणांचा स्वीकार करावा. कारण हे दोन अंकी गुण तुमची पात्रता ठरवू शकत नाहीत.